Ad will apear here
Next
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महिला आरोग्यविषयक कार्यशाळा
महिला आरोग्यविषयक कार्यशाळेत सहभागी डॉक्टर्स
बारामती :
विद्यापीठ अनुदान आयोग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि निरामय मेडीकल व रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्यविषयक जाणीवजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सोलापूर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.रोहिणी देशपांडे यांनी ‘वयात येताना’ या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. ‘सध्याच्या ताणतणावाच्या युगात मुलींनी शारीरिक स्वच्छता, समतोल व सकस आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप या गोष्टींचे पालन केल्यास त्या मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होतील’, असा सल्ला त्यांनी दिला. महिलांसाठी ‘चाळीशीनंतरचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी स्त्रियांनी वयोमानपरत्वे बदलणाऱ्या शारीरिक रचनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असा संदेश दिला.

त्यानंतर पुण्यातील अय्यंगार इन्स्टिट्यूटच्या डॉ. दीपा फाटक यांनी ‘योगा आणि जीवन’ या विषयावर बोलताना डॉ.फाटक यांनी ‘सुप्त बद्ध कोनासन’, ‘अधो मुख श्वसनासन’, ‘उत्तानासन’, ‘अर्धचंद्रासन’, ‘सर्वांगासन’ इत्यादी आसनांची प्रात्यक्षिके विद्यार्थिनी सोबत सादर केली. विशेषतः स्त्रियांच्या मेनोपोझच्या काळात करावयाच्या आसनांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात बारामती येथील वेदना निवारण तज्ञ डॉ. कीर्ती पवार यांचे ‘हेल्दी लाइफस्टाइल’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘आत्मविश्वासाने जगा, नेहमी आनंदी राहा, वेगवेगळे छंद जोपासा व स्वतःला उत्तर द्यायला बांधील रहा’ असा सल्ला त्यांनी दिला.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. मयुरी मुरुमकर यांनी वाढत्या वयातील स्त्रियांच्या हाडांतील कमजोरी, सांधेदुखी, कंबरदुखी वगैरे व्याधींविषयी चर्चा केली. त्याचबरोबर स्त्रियांनी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःच्या शरीराची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर होते. जवळपास ६०० विद्यार्थिनी व महाविद्यालयातील १५० हून अधिक महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. स्त्रियांनी प्रश्नोत्तर व संवादाच्या माध्यमातून आरोग्यविषयक अनेक शंकांचे समाधान करून घेतले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा. सीमा नाईक-गोसावी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. योगिनी मुळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सुचेता दोशी यांनी केले. सूत्रसंचालन कोमल महांगडे व काजल सोनावणे या विद्यार्थिनींनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTTBG
Similar Posts
व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलभूत हक्क : डॉ. रझिया पटेल बारामती (पुणे) : 'स्त्री आणि पुरुष ही मानवी व्यक्तिमत्वाचे दोन अविभाज्य भाग आहेत. ते दोन्ही समसमान आहेत याची जाणीव आजच्या युगातल्या युवकांना असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य हा त्याचा मूलभूत हक्क आहे,' असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. तुळजाराम चतुरचंद
राष्ट्रीय आयोगाच्या तज्ञ समिती सदस्यपदी प्रा. विनायक लष्कर बारामती (पुणे) : प्रा. विनायक सुभाष लष्कर यांची राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि निम्नभटक्या जाती-जमाती आयोगाच्या तज्ज्ञ समिती सदस्यपदी (कार्यगट) नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगात एकूण आठ कार्यगट असून, प्रा.लष्कर हे त्यापैकी तीन गटांचे सक्रिय सदस्य आहेत. या कार्यगटांमध्ये भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांचे
‘शिक्षणातील बदलते प्रवाह जाणून घेणे गरजेचे’ बारामती : ‘पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणे हे आजच्या शिक्षकाचे कर्तव्य आहे. हा बदल करण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात बदलत असलेले प्रवाह जाणून घेणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे विभागाचे उच्च शिक्षण सह संचालक डॉ
बारामती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात पुणे : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बारामती येथे तालुका प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच म. ए. सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिनाचा कार्यक्रम म. ए. सोसायटीच्या मैदानावर घेण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language